PAK Vs NZ T20 World Cup 2022 Pakistan Beat New Zealand By 8 Wickets Riches Final

  0
  8


  PAK vs NZ, T20 WC : ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा पहिला सेमीफायनल सामना खेळवला गेला. ज्यात पाकिस्तानने 7 गडी राखून विजय मिळवत फायनल गाठली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर पाकिस्तानने सलामीवीर बाबर आणि रिझवानच्या मदतीनं एक दमदार सुरुवात केली आणि अखेर 7 गडी राखून विजय मिळवला. 

  सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करुन पाकिस्तानवर प्रेशर देण्याचा डाव त्यांचा होता. पण पाकिस्तानी गोलंदाजानी सुरुवातीपासून दमदार गोलंदाजी केली. खासकरुन शाहीन शाह आफ्रिदीने त्याचा दम दाखवत महत्त्वाचे विकेट्स घेतले आणि धावांही रोखून ठेवल्या. ज्यामुळे न्यूझीलंडनं सुरुवातीपासून विकेट गमावल्या. फिन अॅलन 4 तर कॉन्वे 21 धावा करुन बाद झाला. ग्लेन फिलिप्सही 6 धावांवर तंबूत परतला. ज्यानंतर मात्र केन आणि मिशेलनं डाव सावरला. केन 46 धावांवर बाद झाला तर मिशेलनं नाबाद 53 धावा केल्या. नीशमनंही नाबाद 16 धावाचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 2 तर मोहम्मद नवाजनं एक विकेट घेतली.

  रिझवान-बाबर जोडी पुन्हा चमकली

  153 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं आज सुरुवातच दमदार केली. सलामीवीर बाबर आणि रिझवान यांना धडाकेबाज अशी अर्धशतकं ठोकली. बाबर 53 धावा करुन बाद झाला, पण त्यानंतर रिझवानने झुंज कायम ठेवली. मोहम्मद हारिसनेही 30 धावांची साथ रिझवानला दिली. रिझवाननं पाकिस्तानकडून सर्वाधिक 57 धावा केल्या. ज्यानंतर शानच्या नाबाद 3 धावांनी पाकिस्ताननं 19.1 षटकांत सामना जिंकत 7 विकेट्सनी विजय मिळवला. आता पाकिस्तान 13 नोव्हेंबर रोजी फायनल खेळणार आहे.

  दुसरी सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड

  आता पाकिस्तान संघाने फायनलमध्ये धडक घेतली आहे. आता उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार असून त्यांच्यात जिंकणारा संघ पाकिस्तानविरुद्ध 13 नोव्हेंबरला फायनलचा सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळणार आहे.

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here