Pakistan vs New Zealand Score Live Updates T20 World Cup Semi-final PAK vs NZ Live Telecast Online TV

  0
  10


  T20 World Cup 2022: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतलाय. दोन्ही संघ या सामन्यात एकमेकांना कडवं आव्हान देतील, अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. तसेच आजचा सामना जिंकून फायनलचं तिकीट मिळवण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. 

  न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील सामना कधी, कुठं पाहायचा?
  न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला सेमीफानयल सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.

  हेड टू हेड रेकॉर्ड
  टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा संघ एकूण सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यातील चार सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंडच्य संघाला दोन सामने जिंकता आले आहेत. दरम्यान, 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले होते, ज्यात पाकिस्तानने सहा विकेट्सनं विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 28 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यातील 17 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय नोंदवला आहे. तर, न्यूझीलंडच्या संघानं 11 सामने जिंकले आहेत. यातील आठ सामने न्यूझीलंडच्या संघानं त्यांच्या मायदेशात जिंकले आहेत. तर, पाकिस्तानच्या संघानं घरच्या मैदानावर सात  आणि उर्वरित 10 सामने न्यूट्रल ठिकाणावर जिंकले आहेत. 

  संघ-

  न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
  फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

  पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
  मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

  हे देखील वाचा-  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here