In India Vs England T20 In T20 World Cup 2022 Know Pitch Report And Weather Report Adelaide Pitch Report Details

  0
  12


  IND vs ENG, Pitch Report : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील (T20 World Cup 2022) दुसरा सेमीफायनलचा (IND vs ENG Semifinal 2) सामना आज भारत आणि इंग्लंड (India vs England) असा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडला (Pakistan vs New Zealand) मात देत फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. दरम्यान फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असून त्यामुळेच या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.

  भारत विरुद्ध इंग्लंड हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये (Adelaide Cricket Stadium) आमनेसामने येणार आहेत. अॅडलेडची खेळपट्टी (Adelaide Pitch Report) फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. पण सोबतच गोलंदाजांनाही फायदा मिळू शकतो.  येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 आहे, इतर मैदानांच्या तुलनेत ही बरीच जास्त आहे. फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यास ते सहज मोठी धावसंख्या उभारु शकतात. पण गोलंदाजही सुरुवातीच्या षटकातच विकेट्सची आशा करतील. अॅडलेड ओव्हलचे मैदान मोठे असल्याने गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.  

  कसा आहे आजवरचा इतिहास?

  टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) संघ यांच्यात आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 22 पैकी 12 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 10 सामने जिंकता आले आहेत.  

  कशी असू शकतो दोन्ही संघाची संभाव्य 11?

  संभाव्य भारतीय संघ

  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

  संभाव्य इंग्लंडचा संघ  

  अॅलेक्स हेल्स, जोस बटलर(कर्णधार), बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, फिल सॉल्ट, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड/डेव्हिड विली.

  हे देखील वाचा-  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here