IND Vs ENG: Rohit Sharma Breaks Down After India Lose To England In T20 World Cup 2022 Semifinal

  0
  10


  Rohit Sharma Breaks Down: इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताचा टी-20 विश्वचषकातील (IND vs ENG) आव्हान संपुष्टात आलंय. टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी भारताचं फायनल गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फेरत इंग्लंडला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांचं मनं तुटलं. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माचा डगआऊटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

  सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू इंग्लंडच्या खेळाडूंसोबत हात मिळवून डगआऊटमध्ये पोहोचले, तेव्हा रोहित शर्मा भावूक झाला. बराच वेळ रोहित शर्मा राहुल द्रविडसोबत बोलताना दिसला. दोघांमध्ये थोडावेळ चर्चा झाली. त्यानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळाली. त्यावेळ राहुल द्रविडनं त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

  व्हिडिओ-

   

  विराट कोहली- हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ
  सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेले भारतीय सलामीवीर इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर संघर्ष करताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताची सर्वात मोठी अपेक्षा असलेल्या सूर्यकुमार यादवला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही.  या सामन्यात त्यानं 10 चेंडूत 14 धावा केल्या. ज्यात एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. आदील राशीदच्या चेंडूवर मोठ्या शॉट खेळण्याचा प्रयत्नात सूर्या आऊट झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं अर्धशतकीय खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. 

  ट्वीट-

  भारताचा टी-20 विश्वचषक 2022 मधील प्रवास

  – पाकिस्तानविरुद्ध चार विकेट्सनं विजय
  – नेदरलँड्सविरुद्ध 56 धावांनी विजय
  – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच विकेट्सनं पराभव
  – बांगलादेशविरुद्ध पाच धावांनी विजय
  – झिम्बाब्वेविरुद्ध 71 धावांनी विजय
  – इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सनं पराभव

  हे देखील वाचा-

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here