Oculus Rift Creator Unveils New Vr Headset Die In Game You Die In Real Life

  0
  9


  Virtual Reality Headset : मॉडर्न व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या ( Virtual Reality ) जगातील प्रसिद्ध व्यक्तीने आता एक नवीन व्हीआर गेम बनवला आहे. याची विशेष बाब म्हणजे या गेममध्ये एखाद्या खेळाडू हरल्यावर त्या खेळाडूचा खऱ्या आयुष्यातही मृत्यू होईल. मॉडर्न व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (VR) गेम ऑक्युलस डिफेन्स ( Oculus ) आणि कॉन्ट्रॅक्टर ( Defense Contractor ) बनवणाऱ्या पाल्मर लकी  ( Palmer Luckey ) याने एक नवीन व्हीआर गेम तयार केल्याचा दावा केला आहे. या गेममध्ये एखाद्या खेळाडूचा मृत्यू झाल्यावर त्या खेळाडूचा खऱ्या आयुष्यातही मृत्यू होईल, असा दावा लकी याने केला आहे.

  पाल्मर लकी याने एक व्हीओर हेडसेट ( VR Headset ) तयार केला आहे. या व्हीआर गेममध्ये खेळाडू हरला आणि त्याचा मृत्यू झाला तर व्हिआरमधील सेंसर खेळाडूच्या मेंदूवर शक्तिशाली सूक्ष्म लहरींचा मारा करेल आणि त्या खेळाडूचा खरोखर मृत्यू होईल, असं लकीने सांगितलं आहे. या व्हीआर हेडसेटचं नाव ‘नर्व्हगियर’ ( NerveGear ) असं आहे. पामर लकीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, व्हीआर हेडसेट ‘नर्व्हगियर’ ( NerveGear ) थेट न्यूरल इंटरफेस वापरून वर्चुअल वर्ल्ड तयार करतो.

  ( Palmer Luckey )

  गेम अर्धवट सोडल्यावर किंवा हरल्यावर जाईल जीव

  या व्हीआर डिव्हाइसमध्ये स्क्रीनच्या अगदी वरच्या बाजूला तीन स्फोटक चार्ज मॉड्यूल आहेत. गेम बनवणाऱ्या लकीने दावा आहे की, हे चार्ड मॉड्यूल मेंदूला थेट लक्ष्य करत त्यावर किरणांचा मारा करतील आणि मेंदूवर त्याचा परिणाम होऊन खेळाडूचा मृत्यू होईल. हा व्हीआर गेम Sword Art Online या अॅनिमेशन सीरीजवर आधारित आहे. या व्हीआर गेमच्या स्क्रीनवर गेम ओव्हर ( GaMe Over ) असं दिसल्यावर चार्ज मॉड्यूलमधून खेळाडूच्या मेंदू घातक किरणांचा मारा करण्यात येईल.

  गेम बनवणाऱ्यालाही नाही खेळायची हिंमत

  पाल्मर लकी या गेम बनवणाऱ्यालाही हा गेम खेळायची हिंमत होत नाहीत. पाल्मर लकीने सांगितलं आहे की, त्यानेही अद्याप हा व्हीआर गेम खेळायचं धाडस केलेलं नाही. 

  वर्चुअल वर्ल्डला खऱ्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न

  पाल्मर लकी यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, वास्तविक जीवनाला आभासी जगासोबत ( Virtual World ) जोडण्याची कल्पना नेहमीच त्यांना आकर्षित करत होती. 

     Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here