Sanjana Ganesan Reply To Troller On Social Media Who Comment About Jasprit Bumrah

0
10


Sanjana Ganesan: क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. संजना ही टीव्ही होस्ट आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप कव्हर करत आहे. नुकताच संजनानं ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील एक फोटो शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला संजना गणेशननं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

रेड ड्रेस आणि व्हाईट शूज या लूकमधील फोटो संजनानं सोशल मीडियावर शेअर केला. ‘एडिलेडमधील वातावरण खूप छान आहे.’ असं कॅप्शन संजनानं फोटोला दिलं. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘तुम्ही सुंदर दिसत नाहीत, तरी देखील बुमराहनं तुम्हाला कसं पटवलं?’ या कमेंटला संजनानं रिप्लाय दिला, ‘तू स्वत: चप्पल सारखं तोंड घेऊन फिरत आहेस, त्याचं काय?’ संजनाच्या या रिप्लायचं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. काही युझर्सनं संजनाच्या या रिप्लायचं कौतुक केलं आहे.

Reels


15 मार्च 2021 रोजी संजनानं जसप्रीतसोबत लग्नगाठ बांधली. जसप्रीत आणि संजनाचा विवाह सोहळा गोव्यात पार पडला. संजनानं 2014 मध्ये स्प्लिट्सविलामध्ये सहभाग घेतला होता. 

संजना गणेशन ही क्रिकेट अँकर आहे. ती बर्‍याच क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. आयपीएलमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त ती स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत होती. 2019 आयसीसी विश्वचषक ते इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला संजनाने होस्ट केले आहे, त्याशिवाय संजना कोलकाता नाईट रायडर्सची अँकर म्हणून काम करत आहे. संजनाने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचे विजेतेपद जिंकले होते.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहकडून पत्नी संजनासोबतचा रोमँटिक फोटो शेअर, कॅप्शनमध्ये लिहिलंय…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here