Shehnaaz Gill Got Emotional After Watching Film Uunchai

0
9


Shehnaaz Gill: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.  बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली. शहनाजनं नुकतीच ऊंचाई (Uunchai) या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला  सलमान खान, अक्षय कुमार, काजोल, माधुरी दीक्षित, जया बच्चन आणि रानी मुखर्जी  हे कलाकार  उपस्थित होते. यावेळी शहनाजनं हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. 

ऊंचाई पाहून इमोशनल झाली शहनाज
स्क्रिनिंग झाल्यानंतर शहनाजनं पॅपराजीसोबत संवाद साधला. यावेळी ऊंचाई चित्रपटाबद्दल शहनाज म्हणाली, ‘मी हा चित्रपट पाहिल्यानंतर खूप इमोशनल झाले. मी चित्रपट पाहून रडले. हा चित्रपट प्रत्येकानं बघावा. आयुष्यात अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते, असा संदेश या चित्रपटागद्वारे देण्यात आला आहे.’  अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 


बिग बॉसनंतर शहनाजनं ‘भुला दूंगा’, ‘कह गई सॉरी’, ‘कुर्ता पायजामा’, ‘वादा है’, ‘शोना शोना’ आणि ‘फ्लाई’ या म्युझिक अल्बममध्ये काम केलं आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘हौंसला रख’ या चित्रपटांमधून शहनाज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटात शहनाजसोबत दिलजीत दोसांझनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

शहनाजचा आगामी चित्रपट

लवकरच शहनाजचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिका साकारणार आहे तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सलमानचा लूक रिव्हील करण्यात आला. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Uunchai Trailer : मैत्रीवर भाष्य करणाऱ्या ‘ऊंचाई’चा ट्रेलर रिलीज; अमिताभ-परिणीती मुख्य भूमिकेत

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here