Lata Mangeshkar Song Didi Tera Devar Deewana Remixed By Rapper Drake Video Viral

0
8


Lata Mangeshkar:  ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या गाण्यांना देशातीलच नाही तरी परदेशातील देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. लतादीदींच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लतादीदींच्या ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन ऐकायला येत आहे. 

गायक आणि रॅपर ड्रेकच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  लता मंगेशकर यांच्या ‘दीदी तेरा देवर दिवाना’ या गाण्याचं रिमिक्स ड्रेकनं केलं आहे, हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. तर काही नेटकऱ्यांनी या गाण्याचं रिमिक्स करणाऱ्या ड्रेकला ट्रोल केलं आहे. 

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 

‘ड्रेक आणि लिल वेन यांनी लता मंगेशकर यांचा सन्मान केला.’ काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करुन ड्रेकला ट्रोल केलं आहे. या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘मी या शोमध्ये होतो, असं काही झालं नाही.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘मी रिमिक्स संगीताचा चाहता आहे. पण हे मला नाही आवडलं.’ 

Reels

पाहा व्हायरल व्हिडीओ


1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील ‘दीदी तेरा देवर दिवाना’ हे गाणं लोक आजही आवडीनं ऐकतात. हे गाणं लता मंगेशकर आणि एसपी बालासुब्रमण्यम यांनी गायले आहे. या गाण्याचे गीतकार देव कोहली हे आहेत. गाण्यातील सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Lata Mangeshkar: ‘सम्राज्ञी’; लतादीदींचा जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंटरीची घोषणा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here