Rishabh Pant Sacrifices Wicket For Hardik Pandya; Gives All-rounder Thumbs Up In T20 World Cup 2022 Vs England

  0
  11


  T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफानयल भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. भारतीय संघ पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक स्पर्धेतून मोकळ्या हातानं मायदेशात परतत आहे. या पराभवानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंमध्ये निराशाजनक वातावरण पाहायला मिळत आहे. तर, चाहते भारतीय संघाच्या कामगिरीवर नाराज आहे. सध्या सोशल मीडियावर भारताची संघाचा युवा फलंदाज ऋषभ (Rishabh Pant) पंतवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यानं सामन्यादरम्यान हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) दिलेल्या त्यागाची जोरदार चर्चा सुरू आहे.

  सुपर 12 स्पर्धेतील झिम्ब्बाब्वेविरुद्ध सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. मात्र, या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं इंग्लंडविरुद्ध सामन्यात त्याला वगळलं जाईल, अशी शक्यता होती. मात्र, रोहित शर्मानं त्याला आणखी एक संधी देण्याचं ठरवलं आणि इंग्लंडविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश केला. शेवटच्या दोन षटकांत पंतला फलंदाजीची संधी मिळाली. त्याच्याकडून काही मोठे फटके अपेक्षित होते. पण पंत अवघ्या सहा धावांवर असताना रनआऊट झाला. 

  व्हिडिओ-

   

  हार्दिकसाठी ऋषभ पंतचा त्याग
  भारताच्या डावातील 19व्या षटकात कर्णधार जोस बटलरनं ख्रिस जॉर्डनच्या हातात चेंडू सोपवला. ऋषभ पंतला या षटकातील तिसरा चेंडू खेळण्याची संधी मिळाली. पण ख्रिस जॉर्डन उत्तम यॉर्कर टाकला. ऋषभ पंत हा चेंडू हुकला. या चेंडूवर धाव काढणं अवघड वाटत असतानाही दुसऱ्या टोकाला उभा असलेला हार्दिक पंड्या धाव घेण्यासाठी धावला. पण हार्दिक पांड्या आऊट होईल म्हणून ऋषभ पंतनं नॉन स्ट्राईकच्या दिशेनं धावला आणि आपली विकेट्स त्याग केली. हार्दिक पांड्यासाठी ऋषभ पंत धावबाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या सामन्यात हार्दिक चांगली फलंदाजी करत होता. अशा स्थितीत हार्दिकचं मैदानात राहणं गरजेचं आहे, असा विचार करत आपली विकेट्स त्याग केली. 

  हे देखील वाचा-

  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here