Yashoda Uunchai Web Series And Movies Releasing On Ott And Theater This Friday

0
10


Friday OTT and Theatre Releases: आज (11 नोव्हेंबर) काही चित्रपट आणि वेब सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत तर काही चित्रपट हे मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेत्री समांथा रुथ प्रभुचा (Samantha) ‘यशोदा’ (Yashoda) हा चित्रपट आणि अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ऊंचाई (Uunchai) हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे. तसेच मार्व्हल युनिवर्सचा ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर हा चित्रपट देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जाणून घेऊयात आज ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होणारे चित्रपट तसेच ओटीटीवर रिलीज होणाऱ्या काही वेब सीरिज…

‘यशोदा’

समांथा रुथ प्रभुचा ‘यशोदा’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात समंथा बरोबरच  वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

Reels

ऊंचाई

ऊंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कलाकारांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर

मार्व्हल युनिवर्सच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आज ‘ब्लॅक पँथर’चा सिक्वेल ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

‘मोनिका ओ माय डार्लिंग’

राजकुमार, हुमा कुरेशी आणि राधिका आपटे स्टारर ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा क्राईम कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आकांक्षा रंजन कपूर, सिकंदर खेर आणि सुकांत गोयल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वसंत बाला यांनी केले आहे.

मुखबिर

मुखबिर ही एक स्पाय थ्रिलर वेब सीरिज आहे. ही सीरिज Zee5 वर प्रदर्शित होत आहे.  यात झैन खान दुर्रानी, ​​प्रकाश राज, आदिल हुसैन, झोया अफरोज आणि बरखा बिश्त सारखे स्टार्स दिसणार आहेत.

‘थाय मसाज’

‘थाय मसाज’ ही एक कॉमेडी वेब सिरीज आहे. गजराजशिवाय दिव्येंदू शर्मा, सनी हिंदुजा, राजपाल यादव, विभा छिब्बर यांसारखे कालाकारांनी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Shehnaaz Gill: ‘हा चित्रपट पाहून मी रडले’; ‘ऊंचाई’ चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावनाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here