Bipasha Basu Karan Singh Grover Blessed With Baby Girl

0
12


Bipasha Basu : आलिया-रणबीरनंतर लगेचच बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवरने (Karan Singh Grover) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा-करणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. बिपाशाने खार येथील हिंदुजा रुग्णालयात एका गोड मुलीला जन्म दिला आहे. 

लग्नाच्या सहा वर्षानंतर करण आणि बिपाशा आई-वडील झाले आहेत. बिपाशा गेल्या काही दिवसांपासून मॅटर्निटी शूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत होती. तसेच बिपाशाने बेबी शॉवरचे फोटोदेखील शेअर केले होते. बाळाच्या गोड बातमीने दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर बिपाशा आणि करणचे फोटो शेअर करत ते आपला आनंद व्यक्त करत आहेत.

वयाच्या 43 व्या वर्षी बिपाशाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बिपाशा बसूने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिला आणि करणला मुलगी हवी आहे. त्यांच्या घरी मुलगी जन्माला यावी, अशी त्यांची इच्छा होती आणि आता त्यांची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे.

बिपाशा आणि करणची लव्ह स्टोरी

बिपाशा आणि करणची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं. आता लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा झाले आहेत. धूम 2, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं  कुबूल है,  दिल मिल गए,  दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे.

Reels


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here