Hera Pheri 3 Karthik Aryan Entry In Hera Pheri 3 Information Given By Paresh Rawal

0
8


Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील अक्षय कुमारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या सिनेमात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दिसणार असल्याची चर्चा होती. अशातच ‘हेरा फेरी-3’ (Hera Pheri 3) या सिनेमात कार्तिक दिसणार असल्याची निर्मात्यांनी माहिती दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून ‘हेरा फेरी-3’ या सिनेमात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार असल्याची चर्चा होत होती. अखेर यासंदर्भात परेश रावलने भाष्य केलं आहे. ट्विटरवर एका चाहत्याने परेशला विचारलं,”कार्तिक आर्यन ‘हेरा फेरी-3’ या सिनेमात दिसेल का? यावर परेश रावतने,”होय.. हे खरं आहे”. असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

Reels

कार्तिक आर्यनचे आगामी सिनेमे

कार्तिक आर्यनचा आगामी ‘फ्रेडी’ हा सिनेमा येत्या 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. तसेच ‘शहजादा’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आशिकी 3’, ‘कॅप्टन इंडिया’ आणि कबीर खानच्या आगामी सिनेमातदेखील कार्तिक दिसणार आहे. 

‘हेरा फेरी-3’ या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘फिर हेरा फेरी’ हा या सिनेमाचा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला होता. हेरा फेरी या सिनेमात परेश रावल यांनी बाबू भाई ही भूमिका तर अक्षयनं राजू ही भूमिका साकारली. सुनीलनं श्याम ही भूमिका साकारली होती. हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सिनेमात जॉनी लिव्हर, बिपाशा बासू, तब्बू या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 

मीडिया रिपोर्टनुसार,’हेरा फेरी, वेलकम आणि आवारा पागल दीवाना हे अक्षय कुमारचे तीन सर्वात आवडते सिनेमे आहेत. त्यामुळे या सिनेमांच्या सिक्वलमधून प्रेक्षकांना भेटण्यासाठी तो फार उत्सुक आहे. अनेक चर्चांनंतर त्याने या प्रोजेक्टमधून एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्याला सिनेमाचं स्क्रिप्ट पसंत पडत नाही. 

संबंधित बातम्या

Hera Pheri 3 : ठरलं! ‘हेरा फेरी-3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; निर्मात्यांनी दिली माहिती

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here