Is Kangana Ranaut Going To Be Banned On Instagram Too The Actress Vented Anger By Calling It A Stupid App

0
10


Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना कनौत (kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर टीका केली जाते. आता पंगाक्वीन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ट्वीटवर बंदी घातलेली असताना कंगनाने आता इंस्टाग्रामवर पंगा घेतला आहे. तिने इंस्टाग्रामला वाह्यात म्हटलं आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने इंस्टा स्टोरी शेअर करत म्हटलं आहे,”इंस्टाग्राम’ या अॅपचा वापर फक्त फोटो शेअर करण्यासाठी होतो. इंस्टाग्रामवर आपण मांडलेले आपले विचार एका दिवसात गायब होतात. ज्यांचा स्वत:च्या विचारांवर विश्वात नसतो त्यांच्यासाठी हे अॅप योग्य आहे”.

कंगनाने पुढे लिहिलं आहे,”पण काही मंडळींचा त्यांच्या लिखानावर, मतावर विश्वास असतो, त्यांचं काय? विचारांचा संग्रह करायला मला आवडतं. एखाद्या गोष्टीवर थोडक्यात भाष्य करण्यासाठी या अॅपचा योग्यपद्धतीने वापर करता येऊ शकतो”. 

Reels

कंगनाचं ट्विटरवर कमबॅक?

कंगनाने 2021 साली ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तिचे ट्विटर अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. पण आता इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून कंगना ट्विटरवर पुन्हा येऊ शकते अशा चर्चांना वेग आला आहे. कंगनाने ट्विटरवर पुन्हा यावे अशी तिच्या चाहत्यांचीदेखील इच्छा आहे. कंगनाला तिचे ट्विटर अकाऊंट पुन्हा कधी मिळणार यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 


कोटींच्या घरात कंगनाची कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना ब्रँड एंडोर्समेंटमधून सर्वाधिक कमाई करते. ती एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 3-3.5 कोटी रुपये आकारते. आता ती अभिनेत्रीसोबतच एक फिल्म प्रोड्यूसरही बनली आहे. रिपोर्टनुसार ती एका वर्षात सुमारे 15 कोटी रुपये कमवते. कंगना रनौतची मुंबईत 1-2 नव्हे, तर तीन घरे आहेत. मुंबईशिवाय कंगनाचा मनालीमध्येही बंगला आहे. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Kangana Ranaut : कधीकाळी एक ब्रेड खाऊन दिवस काढणारी कंगना आज करोडोंची मालकीण! वाचा तिच्या या प्रवासाबद्दल…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here