Shah Rukh Khan Was Stopped By The Customs Department At Mumbai Airport Had To Pay Lakhs Of Rupees

0
12


Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. याची किंमत 18 लाख आहे. त्यामुळे शाहरुखला 6.83 लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली.

संपूर्ण प्रकरण काय? 

शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. दुबईहून येत असताना कस्टम विभागाने शाहरुखला रोखलं. तब्बल एक तास शाहरुखची चौकशी सुरू होती. किंग खानच्या बॅगमध्ये अनेक महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या घड्याळांची किंमत लाखो रुपये आहे. पण त्याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखची चौकशी करण्यात आली आहे. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्डचीदेखील चौकशी करण्यात आली. 


Reels

शाहरुख एका खाजगी चार्टर  VTR – SG ने आपल्या टीमसोबत दुबईत गेला होता. त्यावेळी कस्टम विभागाला शाहरुखच्या बॅगमध्ये लाखो रुपयांचे घड्याळे आणि त्या घड्याळांचे महागडे बॉक्स सापडले. त्यानंतर शाहरुखची चौकशी झाली. या प्रकारामुळे शाहरुखला 6 लाख 87 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. 

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच शाहरुखला दुबईत ‘ग्लोबल आयकॉन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी शाहरुखला ग्लोबल आयकॉनने सन्मानित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : किंग खान ‘ग्लोबल आयकॉन’ अवॉर्डनं सन्मानित; सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here