England Won Match Against Pakistan By 5 Wickets And Won T20 World Cup 2022 Know Top 10 Points

  0
  10


  PAK vs ENG, T20 World Cup 2022 : इंग्लंड संघानं टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानवर 5 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवत चषकावर नाव कोरलं आहे. सामन्यात आधी नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने भेदक गोलंदाजी करत 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. यावेळी करननं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू…

  PAK vs ENG 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकूत इंग्लंडनं सामना जिंकला आहे. 
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामनावीर म्हणून सर्वोत्त गोलंदाजी करणाऱ्या सॅमला गौरवण्यात आलं, तर स्टोक्सनेही एकहाती झुंज दिल्याचं पाहायला मिळालं.
  3. इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  4. ज्यानंतर पाकिस्तानकडून खास फलंदाजी न झाल्याने इंग्लंडसमोर अवघ्या 138 धावाचं लक्ष्य होतं.  
  5. पाकिस्तानकडून कर्णधार बाबरने 32 तर शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या.
  6. 138 धावांचं माफक लक्ष्य गाठतानाही इंग्लंडला फार अडचणी आल्या. त्यांची सुरुवातही खास झाली नाही. अॅलेक्स 1, फिलीप 10 आणि कर्णधार बटलर 26 रनांवर तंबूत परतला. 
  7. मग स्टोक्स आणि ब्रुकने डाव सावरला पण ब्रुक 20 रनांवर बाद झाला. स्टोक्सची झुंज कायम होती. त्याला मोईन अलीने 19 रनांची साथ दिली. 
  8. पाकिस्तानकडून भेदक गोलंदाजी सुरुच होती, पण त्यांचा स्टार गोलंदाज शाहीन सामन्यामध्येच दुखापतग्रस्त झाल्याचं दिसून आलं. त्यात आव्हाही माफक असल्यानं इंग्लंडनं 19 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून पूर्ण केलं.
  9. इंग्लंडचा विजय स्टोक्सने पक्का करत नाबाद 52 धावांच्या मदतीने संघाला सामना जिंकवून दिला.
  10. सामनावीर म्हणून अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या सॅम करनला गौरवण्यात आलं

  हे देखील वाचा-

  Reels  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here