Happy Birthday Juhi Chawla Raja Hindustani To Dil To Pagal Hai Miss India Rejected Superhit Movie Know Superstar Juhi Chawla Special Things

0
8


Juhi Chawla : जुही चावला (Juhi Chawla) बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. 80-90 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत जुहीचा चांगलाच दबदबा होता. 1988 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातील जुहीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. तसेच ‘डर’, ‘दीवाना मस्ताना’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार’ यांसारख्या अनेक सिनेमांत जुहीने काम केलं आहे. आज जुही 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.  

जुही चावला अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. जुहीने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासात फक्त सुपरस्टार्ससोबतच नाही तर नामांकित निर्माते आणि दिग्दर्शकांसोबतदेखील काम केलं आहे. 80-90 च्या दशकात निर्माते आणि दिग्दर्शक अभिनेत्रींची निवड करताना पहिली पसंती जुहीला देत असे. त्यामुळेच ती बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत झळकली आहे. पण जुहीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे नाकारले आहेत. 

जुहीने नाकारले ब्लॉकबस्टर सिनेमे

जुही चावलाने मनोरंजनसृष्टीत स्वत:चं नाव कमवल्यानंतर बॉलिवूडचे अनेक सिनेमे नाकारले आहेत. जुहीने नाकारलेले हे सिनेमे पुढे जाऊन ब्लॉकबस्टर ठरले आहेत. यात ‘बीबी नं 1’, ‘राजा हिन्दुस्तानी’, ‘दिल तो पागल है’, ‘राजा बाबू’ या सिनेमांचा समावेश आहे. हे सिनेमे त्यावेळी जुहीने नाकारल्याने तिचे चाहते नाराज झाले होते. 

जुही चावला 1984 ची मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडियाची विजेती झाल्यानंतर जुही चावलाच्या फिल्मी प्रवासाला सुरुवात झाली. ‘सल्तनत’ या सिनेमाच्या माध्यमातून जुहीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘कयामत से कयामत तक’ हा जुहीचा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाने जुहीला लोकप्रियता मिळाली.

Reels

सलमानला करायचं होतं जुहीसोबत लग्न 

‘दिवाना मस्ताना’ या सिनेमात जुही चावला आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात दोघांचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण खऱ्या आयुष्यात त्यांची लग्नन करण्याची इच्छा अपुरी राहिली आहे. सलमानला जुहीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यानंतर जुही 1997 साली उद्योगपती जय मेहतासोबत लग्नबंधनात अडकली. राकेश रोशनने जुही आणि जयची भेट घडवून आणली होती.

जुही चावलाने बॉलिवूडसह  बंगाली, पंजाबी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषेतील सिनेमांमध्येदेखील काम केलं आहे. 80-90 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत जुहीची गणना होत असे. जुहीला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

जुही चावलाची कमाई

कमाईच्या बाबतीत जुही चावला आघाडीवर आहे. तिची एकूण संपत्ती 48 कोटी रुपये आहे. तिचं मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत कोट्यवधी रुपये आहे. तिला महागड्या गाड्यांचीदेखील आवड आहे. 

संबंधित बातम्या

Juhi Chawla : मुंबईतील हवेत दुर्गंधी वाढतेय…, वाढत्या प्रदूषणावर जुही चावलाचे ट्वीटSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here