Manasi Naik Divorce Of Baghtoy Rickshawala Fame Manasi Naik Social Media Posts Spark Discussions

0
10


Manasi Naik : मराठी सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय अर्थात अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकंत असते. ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मानसी रातोरात स्टार झाली. पण सध्या तीवैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मानसीचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले. पण आता मानसी आणि प्रदीपमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं चित्र आहे. तसेच मानसी लवकरच पतीपासून विभक्त होणार असल्याचीदेखील चर्चा आहे. कारण मानसीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे प्रदीपसोबतचे फोटो डिलीट केले आहेत. 


Reels

मानसीने प्रदीपसोबतचे फोटो डिलीट करण्यासोबत इन्स्टाग्राम अकाउंटवरील खरेरा आडनावही हटवलं आहे. त्यामुळेच त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मानसी नाईकने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. पण त्याच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”वाईट बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही, चांगली बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही”. 

मानसीने फोटोला दिलेली कॅप्शन खूप बोलकी आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांनीही एकमेकांसाठी पोस्ट केलेली नाही. पण मानसी-प्रदीपने अद्याप या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. तसेच त्यांच्या नात्याविषयी अधिकृत भाष्य केलेले नाही. मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल आहे. 

संंबंधित बातम्या

Ekdam Kadak:  ‘एकदम कडक’ चा टिझर सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ; चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here