Rocky Aur Rani Ki Prem Kahani The Wait Is Over The Release Date Of Alia Bhatt Ranveer Singh Rocky Aur Rani Ki Prem Kahani Has Been Announced

0
7


Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

करणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. रॉकी आणि राणीच्या प्रेमावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमात प्रेक्षकांना एक रोमॅंटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. 


Reels

करण जोहरने एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, सात वर्षांनंतर पुनरागमन करतो आहे. माझ्या सिनेसृष्टीतील प्रवासात मला एकापेक्षा एक चांगल्या कलाकारांसोबत काम करता आलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाचं कथानक वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी-परंपरांच्या मुळाशी जाणारं आहे. या सिनेमाचं संगीतदेखील उत्तम आहे. प्रतीक्षा संपली आहे… रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी पुढच्या वर्षी 28 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे”. 

आलिया-रणवीरची भाईजानसोबत टक्कर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 22 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर आलिया-रणवीरची भाईजानसोबत टक्कर होणार आहे. 

आलिया आणि रणवीरशिवाय ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या सिनेमात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील दिसणार आहेत. सिनेमाची  रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Kshitee Jog : रणवीर सिंहच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ मध्ये झळकणार मराठमोळी क्षिती जोग

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here