Sania Mirza Shoaib Malik Divorce Case The Mirza Malik Show To Host Talk Show Together Marathi News Updates

0
11


मुंबई: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) घटस्फोट घेणार अशा बातम्या असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा ‘द मिर्झा मलिक शो’ हा टीव्ही कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं होस्ट हे कपल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या या अफवा होत्या का? किंवा हे सर्व काही या शोच्या प्रमोशनसाठी होतं का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. 

गेल्या सहा दिवसांपासून सगळीकडे एकच चर्चा आहे, ती म्हणजे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची. आधी तलाकची पोस्ट, नंतर शोएबच्या अफेर्सची चर्चा आणि आता ‘द मिर्झा मलिक शो’, गेल्या सहा दिवसांमध्ये घडलेल्या या घडामोडी. 

इन्स्टाग्रामवर सानिया मिर्झानं एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यात उर्दू भाषेत भावनिक ओळी होत्या. “टूटे हुए दिल कहां जाते हैं? अल्लाह को खोजने के लिए।” सानियाची ही पोस्ट व्हायरल झाली आणि सानिया आणि शोएबच्या संसाराची काडीमोड होणार अशी चर्चा रंगली. 4 नोव्हेंबरला तर सानियानं आपल्या मुलासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि चर्चा सुरु झाली की सानिया आपल्या मुलासोबत वेगळी राहतेय. सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये या दोघांच्या ब्रेकअपचं इन्व्हेस्टिगेशन सुरु झालं आणि समोर आलं ते शोएब मलिकचं एक कथित अफेअर. 

आयशा उमर या 41 वर्षीय पाकिस्तानी मॉडेलसोबत शोएबचे काही फोटो समोर आले. आयशा उमर पाकिस्तानमधील स्टाईल आयकॉन तर शोएब मलिक क्रिकेट आयकॉन. दोघांनी एक बोल्ड फोटोशूट केलं. त्यानंतर सानिया आणि शोएब वेगळे होणार अशा चर्चा रंगू लागल्या. 

Reels

एका कार्यक्रमात शोएबनं आयशा उमरचं कौतुक केलं आणि दुसरीकडे सानियाची एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे इस्लामाबाद ते हैदराबाद या ठिकाणी पती, पत्नी और ओ अशी चर्चा  रंगली. ही चर्चा ऐन रंगात आली आणि उर्दूफ्लिक्सनं एक पोस्ट केली. ती होती द मलिक मिर्झा शोची. कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झा दोघंही एकत्र दिसत आहेत. त्यानंतर सोशल मीडिया ट्रेण्ड सुरु झाला तो म्हणजे या तलाकच्या चर्चा, अफेअर्सच्या पोस्ट फक्त या कार्यक्रमाच्या प्रोमोशनसाठीच केल्या होत्या का?

कबुल है म्हणत 2010 साली लग्नगाठ बांधणाऱ्या सानिया आणि शोएबला एका कार्यक्रमाच्या प्रोमोशनसाठीच ‘तलाक है’ असं म्हणावं लागलं का? आता द मिर्झा मलिक शोच्या पहिल्या भागात या प्रश्नांची उत्तर मिळातील हीच अपेक्षा.

 


पाहा फोटो

घटस्फोटाच्या अफवा? सानिया-शोएबचा ‘द मिर्झा मलिक शो’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here