T20 World Cup 2022 England Champion Final Match Wins By 5 Wickets Against Pakistan

  0
  9


  England Champions T20 WC 2022: पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं. मेलबर्नच्या मैदानात झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला. रोमांचक सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान सामन्यात वरचढ झाला होता. पण बेन स्टोक्स याने संयमी फलंदाजी करत सामन्याचं चित्र पलटवलं. एका बाजूला विकेट्स पडत असताना बेन स्टोक्सनं संयमी फलंदाजी केली. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने चुकाही केल्या, त्यामुळेच विश्वचषक गमवावा लागला. 

  फलंदाजांनी केलेल्या चुकांमध्ये इंग्लंडचे गोलंदाज बरचढ झाले. येथूनच इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवायला सुरुवात केली. फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्यामुळेच संघाचा डाव 20 षटकांत 137 पर्यंत पोहचला. सलामी फलंदाज मोहम्मद रिझवान फक्त 15 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर मोहम्मद हॅरिस 8 धावा काढून बाद झाला.  इफ्तिखार अहमदला तर खातेही उघडता आले नाही. सॅम करन आणि आदिल रशीद यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. सॅम करन याने तीन तर आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. बेन स्टोक्स याने एक विकेट घेतल्या. 

  पाकिस्तानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. पाकिस्तानच्या पराभवाचं हे मुख्य कारण आहे.  पाकिस्तानचे आठ गडी बाद झाले, यामधील चार खेळाडूंना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. पाकिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना वरचढ होण्याची संधी दिली. तेथूनच सॅम करन आणि आदिल रशीद यांनी विजयाची पटकथा लिहिली.  

  इंग्लंडसाठी बेन स्टोक्सची कामगिरी महत्वाची राहिली. फलंदाजी करताना बेन स्टोक्सने 49 चेंडूत 52 धावांची संयमी फलंदाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना स्टोक्सनं संयमी फलंदाजी केली.  इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली होती. अवघ्या सात धावांवर इंग्लंडला पहिला धक्का बसला होती. तर 32 धावांवर दुसरा आणि  45 धावांवर तिसरा धक्का बसला होती.  84 धावांवर इंग्लंडला चौथा धक्का बसला होता. पण बेन स्टोक्सनं एक बाजू लावून धरत संयमी फलंदाजी केली. त्याशिवाय गोलंदाजी करताना स्टोक्सने एक विकेटही घेतली. स्टोक्सच्या संयमी फंलदाजीच्या बळावर इंग्लंडला विजय मिळला. पाकिस्तानचा एकही गोलंदाज स्टोक्सला बाद करु शकला नाही. 

  Reels

  इंग्लंडची फलंदाजी सुरु होती तेव्हा पाकिस्तानने सामन्यावर पकड मिळवली होती, पण बाबर आझम याने  इफ्तिखार अहमद याला षटक दिलं. शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे पाच चेंडू फेकण्यासाठी इफ्तिखारकडे चेंडू दिला. शाहीन आफ्रिदीची दुखापत पाकिस्तानच्या पराभवाचं एक कारण आहे. कारण, मोक्याच्या क्षणी इफ्तिखार याने पाच चेंडूत 13 धावा दिल्या. त्याशिवाय वसीमची चार षटकेही पाकिस्तानला महागात पडली. वसीमने चार षटाकत 38 धावा दिल्या.    Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here