Virat Kohli First Player To Became Leading Run Scorer In Multiple T20 World Cups

  0
  11


  Virat Kohli Leading Runscorer : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारतानं वर्ल्ड कप जिंकला नसला तरी सर्वांचा लाडका विराट पुन्हा फॉर्मात परतल्याचा आनंद भारतीयांना आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ज्यामुळे टी20 विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा विराटने सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे. यावेळी त्याने 6 सामन्यात 296 धावा केल्या. तर याआधी 2014 च्या टी20 विश्वचषकातही कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यावेळी त्याने 319 धावा केल्या होत्या.  

  2022 च्या टी20 विश्वचषकात कोहलीने भारताकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली. त्याने 6 सामन्यात 4 अर्धशतके झळकावली. यादरम्यान कोहलीने 296 धावा केल्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.पण असं असूनही त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा खिताब देण्यात आला नाही. कोहलीने यंदा 25 चौकार आणि 8 षटकार मारले. याशिवाय प्लेअर ऑफ द टूर्नांमेंट म्हणून सॅम करन या इंग्लंडच्या गोलंदाजाला पुरस्कृत करण्यात आलं. 

  टी20 विश्वचषक इतिहासांत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  Reels


  टी20 विश्वचषक मालिकावीर
  2007 टी20 विश्वचषक मॅथ्यू हेडन
  2009 टी20 विश्वचषक तिलकरत्ने दिलशान
  2010 टी20 विश्वचषक महेला जयवर्धने
  2012 टी20 विश्वचषक शेन वॉटसन
  2014 टी20 विश्वचषक विराट कोहली
  2016 टी20 विश्वचषक तमीम इकबाल
  2021 टी20 विश्वचषक बाबर आझम
  2022 टी20 विश्वचषक विराट कोहली

  हे देखील वाचा-  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here