G20 Summit Meeting With 10 Leaders Including Rishi Sunak Will Talk On These Issues Including Ukraine War

  0
  10


  G20 Summit 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडोनेशियामधील ( Indonesia ) बाली ( Bali ) शहरात जी20 शिखर संमेलनात ( G20 Summit 2022 ) सहभागी होतील. हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. पंतप्रधान आज दौऱ्यासाठी रवाना होतील. शिखर संमेलनात विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आरोग्य, साथीच्या रोगानंतरची आर्थिक आपप्ती, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रातील महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. या परिषदेत आव्हानांना तोंड देण्यासाठी या शिखर परिषदेत भारत आपला दृष्टीकोन मांडणार आहे.

  रशिया युक्रेन युद्धासह महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

  15 आणि 16 नोव्हेंबर रोजी 17 वी जी20 शिखर इंडोनेशियामध्ये पार पडणार आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्ष आणि त्याचा जगावर झालेला परिणाम यासोबतच जागतिक आव्हानांवर आज शिखर संमेलनात व्यापक चर्चा होईल. जी20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंडोनेशियाच्या बाली शहराला तीन दिवसांच्या भेटीवर रवाना होतील.

  ‘या’ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होतील?

  अमेरिकेचे ( America ) अध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden ), ब्रिटनचे ( Britain ) पंतप्रधान ऋषी सुनक ( Rishi Sunak ), फ्रान्सचे ( France ) राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( Emmanuel Macron ), जर्मनीचे ( Germany ) चांसलर ओलाफ स्कोल्झ ( Olaf Scholz ) आणि चीनचे ( China ) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ( Xi Jinping ) हेही जी20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सामील होणार असूनच अनेक राष्ट्रप्रमुखांसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि सुनक यांची भेट होणार आहे. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्याक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक होणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

  भारताला मिळणार G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद

  2023 मध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. या परिषदेचे 2023 ला भारतात आयोजन करण्यात येणार आहे. 1 डिसेंबरपासून भारत औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी 17 वी शिखर परिषद पार पडणार आहे. या शिखर परिषदेच्या समारोपाच्या सत्रात इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रतीकात्मकपणे G20 चे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींना सुपूर्द करतील. 

  Reels

   

  शी जिनपिंग यांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह

  अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, इतर नेत्यांसोबतच्या या द्विपक्षीय बैठका अद्याप नियोजन प्रक्रियेत आहेत. पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये उझबेकिस्तान येथे समरकंद शहरात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) वार्षिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते, परंतु या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही द्विपक्षीय बैठक झाली नाही.

  परराष्ट्र सचिव क्वात्रा यांनी सांगितलं आहे की, G20 परिषदेत सर्व राष्ट्रांचे प्रमुख जगासमोरील आव्हानांवर चर्चा करतील आणि त्यांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय सहकार्याचं महत्त्व समजून घेतील. पुढे त्यांनी सांगितलं, ही शिखर परिषद भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ते 1 डिसेंबरपासून एका वर्षासाठी जी शिखर परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे असणार आहे.  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here