T20 World Cup 2022 Rohit Sharma, Dinesh Karthik, R Ashwin Will Retire In T20 Format, Said Monty Panesar

  0
  7


  T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राजीनामा द्यावा, अशा मागणींनी जोर धरलाय. यादरम्यान, भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीबाबतही अटकळ बांधली जातायेत. यातच इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरनं (Monty Panesar) रोहित शर्मा (Rohit Sharma), दिनेश कार्तिक (Dinesh Kartthik) आणि आर अश्विन (R Ashwin) यांच्या निवृत्तीबाबत भाष्य केलंय.

  टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पानेसरनं रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि आर. अश्विन यांची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता घेतलीय. पानेसर म्हणाला की, “भारतीय संघानं सर्वांची निराशा केलीय. या स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघातील काही खेळाडू निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे, सेमीफायनलमध्ये झुंज दिली नाही. हा सामना एकतर्फी होता. बटलर आणि हेल्ससमोर भारतीय गोलंदाजी असहाय्य दिसत होती.  168 ही सन्मानजनक धावसंख्या होती, पण या सामन्यात भारतीय संघानं कोणताही लढा दिल्याचं पाहायला मिळालं नाही.”

   तरुणांना संधी देण्याची वेळ आलीय- पानेसर
  “रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि आर अश्विन ही तीन प्रमुख नावे आहेत जी आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. संघ व्यवस्थापन निश्चितपणे या लोकांसोबत बैठक घेईल आणि त्यांना त्यांच्या योजनांची माहिती देईल. या खेळाडूंनी आता तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे”, असंही पानेसरनं म्हटलंय.

  रोहित, अश्विन आणि कार्तिक यांचं वाढत वय
  रोहित शर्मा, आर अश्विन आणि दिनेश कार्तिक या तिन्ही खेळाडूंनी वयाची 35 वर्ष ओलांडली आहेत. या टी-20 विश्वचषकात तिघेही आऊट ऑफ फॉर्ममध्ये दिसले. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकला धावा काढत्या आल्या नाहीत. तर, आर अश्विनला काही खास कामगिरी करता आली नाही.

  Reels

  टी-20 विश्वचषक 2022 मधील कामगिरी

  रोहित शर्मा
  भारताचा कर्णधार रोहित शर्मा संपूर्ण टी-20 विश्वचषकात संघर्ष करताना दिसला. या स्पर्धेतील सहा सामन्यात त्याला फक्त 116 धावा करता आल्या. एवढंच नव्हे तर, इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात रोहित शर्मानं चुकीचं नेतृत्व आणि प्लेईंग इलेव्हन निवडल्याची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत रोहित शर्मानं भारताचा स्टार आणि अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहललं प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. 

  दिनेश कार्तिक 
  आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर भारताचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकनं भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. त्यानंतर भारताच्या द्विपक्षीत मालिकेत त्यानं चमकदार खेळ दाखवला. ज्यामुळं टी-20 विश्वचषकात त्याची निवड करण्यात आली. या स्पर्धेत दिनेश कार्तिकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती. पण त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. सुरुवातीच्या चार सामन्यात त्याला फक्त 14 धावा करता आल्या. ज्यामुळं झिम्बाब्वे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध सामन्यातून त्याला वगळण्यात आलं. 

  रविचंद्रन अश्विन
  भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनकडून कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघ व्यवस्थापनाला मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यानं सर्वांनाच निराश केलं. टी-20 विश्वचषक 2022च्या सहा सामन्यांमध्ये अश्विनला बॅटनं फक्त 6 धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याला केवळ सहा विकेट घेतल्या. भारताला विकेट्सची आवश्यकता असताना अश्विन कर्णधार रोहित शर्माच्या विश्वासाला खरा उतरू शकला नाही. तज्ज्ञांच्या मते, या स्पर्धनंतर अश्विनसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वाटचाल खडतर होणार आहे.

  हे देखील वाचा-  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here