Varun Dhawan Natasha Dalal Parents Salman Khan Give Hint In Bigg Boss 16

0
11


Bigg Boss 16: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा  (Varun Dhawan) भेडीया (Bhediya) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. वरुण आणि क्रिती हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी वरुण आणि क्रिती यांनी नुकतीच बिग बॉस-16 (Bigg Boss 16)  मध्ये हजेरी लावली. यावेळी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खाननं (Salman Khan) केलेल्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. 

नुकताच बिग बॉस-16 चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, वरुण आणि क्रिती यांना सलमाननं एक टास्क दिला. या टास्कमध्ये सलमाननं वरुण आणि क्रितीला काही चित्रपटांची नावं ओळखायला सांगितली. यावेळी सलमाननं वरुणला एक टॉय दिले.

प्रोमोमध्ये दिसत आहे की वरुणला एक टॉय देऊन सलमान म्हणाला, ‘हे तुझ्या मुलासाठी’ यावर वरुण म्हणाला, ‘अजून मुलं झालं नाही’ त्यानंतर सलमान म्हणाला, ‘लवकरच होईल’ सलमानच्या या वक्तव्यामुळे आता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

पाहा प्रोमो:

Reels


भेडीया या चित्रपटात वरुण आणि क्रिती यांच्यासोबतच दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जी आणि पॉलिन कबाक या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिनेश विज्ञान यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. वरुण आणि क्रितीचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Varun Dhawan and Natasha Dalal: वरूण-नताशाच्या घरी येणार नवा पाहुणा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here