Shah Rukh Khan And Ranbir Kapoor Have Been Seen Mocking Each Other

0
7


Shah Rukh Khan And Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोन्ही सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते आहेत. रणबीर नुकताच बाबा झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे. तर दुसरीकडे शाहरुख त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. दोन्ही अभिनेते अनेकदा एकमेकांची टिंगल करताना दिसून येतात. 

नुकत्याच पार पडलेल्या एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा बादशाह रणबीरला म्हणाला,”रणबीर मी तुला मागील वर्षी हा पुरस्कार सोहळा होस्ट करताना पाहिलं होतं. त्यावेळी तू खूप ओव्हर अॅक्टिंग करत होतास. तर आता या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून मी तुला विनंती करतो, कृपया ओव्हर अॅक्टिंग करणं थांबव”. 

बॉलिवूडच्या बादशाहला रणबीरनं दिलं उत्तर…

बॉलिवूडच्या बादशाहला उत्तर देत रणबीर म्हणाला,”ओव्हर अॅक्टिंग केली नाही तर या पुरस्कार सोहळ्याचं नाव ‘डॉन 2’ ठेवावं लागेल”. रणबीरच्या या उत्तराला प्रतिउत्तर देत किंग खान म्हणाला,”तुझ्या जितक्या गर्लफेंड झाल्या नसतील तेवढे माझ्याकडे फिल्मफेअर अवॉर्ड आहेत”. त्यानंतर रणबीरने शाहरुखची माफी मागितली आहे. 

शाहरुख-रणबीरने केलं चाहत्यांचं मनोरंजन

शाहरुख खान आणि रणबीर कपूर नेहमीच एकमेकांची टिंगल करताना दिसून येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुख आणि रणबीरचा मजेशीर वाद चांगलाच रंगला. या वादामुळे चाहत्यांचं चांगलचं मनोरंजन झालं. तसेच प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर विवेक ओबेरॉय आणि सुभाष घई या सेलिब्रिटींनी शाहरुख-रणबीरची मजा घेतली.

Reels

शाहरुख-रणबीरचे आगामी सिनेमे कोणते?

शाहरुखचा ‘पठाण’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं शाहरुखला दुबईत ‘ग्लोबल आयकॉन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. तर रणबीर कपूरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बॉलिवूड सुपरस्टार्स अनेक बिग बजेट सिनेमांत काम करत असले तरी ते नेहमीच एकमेकांच्या कामाचा आदर करत असतात. पण सोशल मीडियावर नेहमीच एकमेकांची तुलना केली जाते. एकीकडे नेटकरी सेलिब्रिटींना ट्रोल करतात. तर दुसरीकडे चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याचं कौतुक करत असतात. आता शाहरुखने रणबीरची खिल्ली उडवल्याने चाहत्यांचं मात्र मनोरंजन झालं आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी, लाखोंचा भुर्दंडSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here