Siddhaanth Vir Surryavanshi Daughter Diza Emotional Post

0
7


Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला.  सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच सिद्धांतची मुलगी डिजा सूर्यवंशीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले. या पोस्टला सिद्धांतनं खास कॅप्शन देखील दिलं. 

डिजाची पोस्ट
‘यावर कसं रिअॅक्ट करावं हे मला अजूनही कळत नाही. माझे अस्तित्वच सुन्न झाल्यासारखं मला वाटत आहे. या पोस्टचा शेवटच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या आईपासून दूर ठेवत आहे. माझ्या वडिलांना कोणीही हात लावू शकत नाही ते फक्त माझे आहेत, असं मला वाटत होतं.’

‘तुम्ही माझे चांगले मित्र होता. तुम्ही माझ्या सर्व समस्या ऐकून घेत होता. डिजा मला तुझा अभिमान आहे, असं तुम्ही नेहमी म्हणत होता. मला तुमची आठवण येते अप्पा कृपया आनंदी राहा आणि मला मार्गदर्शन करत रहा.’ असंही डिजानं पोस्टमध्ये लिहिलं.


सिद्धांतनं 2000 मध्ये ईरा सूर्यवंशीसोबत लग्न केले पण त्यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मॉडेल आणि फॅशन कोरिओग्राफर आलीसिया राऊतसोबत लग्नगाठ बांधली. 

सिद्धांतनं कुसुम या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानं कसौटी जिंदगी की, कृष्णा-अर्जुन, जमीन से आसमान तक, क्या दिल में है, गृहस्थी, क्यों रिश्तों में कट्टी- बट्टी आणि जिद्दी दिल या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केलं होते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Siddhaanth Vir Surryavanshi: सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या पत्नीनं शेअर केली भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ..’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here