Aishwarya Rai Bachchan Trolled For Lip Kiss Photo Of Daughter Aaradhya Bachchan

0
4


Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच ऐश्वर्यानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर  नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण काही युझर्स या फोटोला कमेंट करुन ऐश्वर्याला ट्रोल करत आहेत. 

ऐश्वर्याची पोस्ट

आज ऐश्वर्याची मुलगी आराध्याचा 11 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं ऐश्वर्यानं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये ऐश्वर्या ही आराध्याला लिप किस करताना दिसत आहे. फोटोला ऐश्वर्यानं कॅप्शन दिलं, ‘माय लव्ह, माय लाइफ, माय आराध्या’ ऐश्वर्याच्या या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

Reels

अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्यानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन तिला ट्रोल केलं. ‘असा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नका’ अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर एका युझरनं कमेंटमध्ये लिहिलं, ‘ही भारतीय संस्कृती नाही. हे लज्जास्पद आहे.’


काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या पोन्नियिन सेलवन या चित्रपटातून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here