Donald Trump Will Contest Presidential Election For Third Time In 2024 Global Marathi News

  0
  8


  Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज 2024 च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (America Presidential Election) लढवण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी तसे संकेतही दिले होते. ट्रम्प म्हणाले होते की, ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि लवकरच त्यांचे विचार जनतेसमोर स्पष्ट करतील. यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर रोजी ट्विट केले होते की, ते 15 नोव्हेंबर रोजी एक मोठी घोषणा करणार आहेत, तेव्हापासून त्यांच्या या वक्तव्याबाबत चर्चा होती की, ते 2024 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

  डोनाल्ड ट्रम्प  म्हणाले…

  2024 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर करताना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेला पुन्हा एकदा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी मी आज अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर करत आहे.”  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here