Vicky Kaushal Film Govinda Naam Mera Will Release On Disney Plus Hotstar

0
4


Govinda Naam Mera Will Release On Ott: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. विकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकीसोबतच अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. धर्मा प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं विकीसोबत चर्चा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये विकी हा ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत चर्चा करताना दिसत आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पण हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर विकी आणि करणनं या व्हिडीओमध्ये दिलेलं नाही. 

विकी कौशल साकारणार ही भूमिका 
विकी कौशल हा ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात एका डान्सरची भूमिका साकारणार आहे. एका डान्सरच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी यांच्यासोबतची विकीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

Reels


विकी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटासोबतच ‘सॅम बहादुर’ या आगामी चित्रपटामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकीच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Govinda Naam Mera: ‘गोविंदा नाम मेरा’: विकी कौशलच्या नव्या चित्रपटाची चर्चा; भूमी आणि कियाराचा हटके लूक

 

 

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here