Tabu To Ajay Devgn Drishyam 2 Star Cast Charge Fees For Movie

0
8


Drishyam 2: बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या कथानकाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दृश्यम 2(Drishyam 2) या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. जाणून घेऊयात या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाबाबत…

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अजय देवगननं या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच अभिनेत्री तब्बूनं या चित्रपटासाठी 3.5 कोटी  फी घेतली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरननं  दृश्यम-2 मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी एवढं मानधन घेतलं आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना हा दृश्यम-2 या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 2.5 कोटी मानधन घेतलं आहे. अभिनेत्री ईशिता दत्तानं या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी ईशितानं 1.2 कोटी फी घेतली आहे. 


दृश्यम-2 हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजयसह तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेत पाठक यांनी केलं आहे. दृश्यमच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्याचं 2020 मध्ये निधन झालं. ‘दृश्यम 2’ या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Drishyam 2 Trailer : सात वर्षांनी अजय देवगण दिसणार विजय साळगावकरच्या भूमिकेत; ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here