Tamannaah Bhatia Reacts On Her Wedding Rumors With Businessman Share Post

0
8


Tamanna Bhatia: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तपन्ना ही एका मुंबईतील बिझनेसमनशी लग्न करणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या चर्चेवर आता तमन्नानं मौन सोडलं आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लग्नाबाबत सांगितलं. ‘हा माझा बिझनेसमन पती आहे.’ अशी पोस्ट तमन्नानं सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कोण आहे तमन्नाचा बिझनेसमन पती?

तमन्ना ही एका बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे, अशी पोस्ट एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली. त्यानंतर तपन्नानं या पोस्टला उत्तर देत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तमन्नानं लिहिलं, ‘हा माझा बिझनेसमन पती आहे’ या पोस्टमध्ये तमन्ना ही एका मुलाच्या लूकमध्ये दिसत आहे.

तमन्नानं ही पोस्ट शेअर करताना मॅरेज रुमर्स अशा हॅशटॅगचा देखील वापर केला आहे. तमन्नानं लग्नाबद्दल पसरलेल्या अफवांना या पोस्टच्या माध्यमतून उत्तर दिलं आहे.   

Reels

पाहा व्हिडीओ: 


तमन्नाची पोस्ट:

बाहुबली या चित्रपटामुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी तमन्नाचा बबली बाउंसर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच तिचा प्लॅन ए प्लॅन बी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तमन्नासोबत रितेश देशमुख हा देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Mithila Palkar: ‘असं वाटतंय डबा…’; मिथिला पालकरच्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here