Shraddha Walker Manish F Singh Announce Movie On Shraddha Murder Case

0
8


Shraddha Murder Case: दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं (Aftab) गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. आता श्रद्धा वालकर प्रकरणावर एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाचं कथानक हे श्रद्धा वालकर प्रकरणावर आधारित असणार आहे. दिग्दर्शक मनीष एफ सिंह (Manish F Singh) हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचं नाव देखील ठरलं आहे. 

काय असेल चित्रपटाचं नाव? 

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ‘Who Killed Shraddha Walker’ असं या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटात श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनप्लेवर सध्या काम सुरु आहे, असंही म्हटलं जात आहे.

मनीष एफ सिंह यांनी सांगितलं की, या चित्रपटात लव्ह जिहाद दाखवण्यात येणार आहे. वृंदावन फिल्म्सद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात कोण-कोणते कलाकार काम करणार आहेत, याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Reels

सेलिब्रिटींनी शेअर केल्या पोस्ट

राम गोपाल वर्मा, केतकी चितळे, आस्ताद काळे आणि स्वरा भास्कर या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन श्रद्धा वालकर प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला होता. “हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे. यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.’ असं ट्वीट स्वरा भास्करनं शेअर केलं होतं. तर ‘तिच्या आत्म्याला शांती मिळण्याऐवजी परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावे’ अशी पोस्ट राम गोपाल वर्मानं केली होती.

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत.  आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, “हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली.’ 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावर बॉलिवूड गप्पं कसं?; सिने-निर्मात्याचा सवाल

 

 Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here