Snehlata Vasaikar Snehlata Vasaikar Has Written A Special Post On The Occasion Of International Mens Day Currently Her Post Is Going Viral On Social Media

0
7


Snehlata Vasaikar On International Mens Day : मराठमोळी अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस’मुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. आज ‘जागतिक पुरुष दिना’निमित्त (International Men’s Day) तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

पतीचा आणि भावाचा फोटो शेअर करत स्नेहलताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिलं आहे,”असं म्हणतात, की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मी म्हणेन, अगदी त्याचप्रमाणे यशस्वी स्त्रीमागेदेखील खंबीर पुरुष असतो… हा खंबीर पुरुष कधी वडील तर कधी भाऊ… कधी मित्र तर कधी नवरा… किंवा स्वत:चा मुलगादेखील असून शकतो”. 

स्नेहलताने पुढे लिहिलं आहे,”आयुष्याच्या विविध टप्प्यांत भेटणारी ही मंडळी कधी आपल्या आयुष्याचे टर्निंग पॉइंट बनतात कळत ही नाही… माझ्याही आयुष्यात अशा दोन महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांना जागतिक पुरुष दिनानिमित्त मी धन्यवाद देऊ इच्छिते, त्या दोन व्यक्ती म्हणजे एक माझे श्रीमान आणि दुसरा माझा भाऊ”. 


‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे स्नेहलता घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने सोयरा बाईसाहेबांची भूमिका साकारली होती. मालिकांसोबत तिने मालिका आणि सिनेमांतदेखील काम केलं आहे. सध्या स्नेहलता ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

स्नेहलता बोल्ड फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत असते. बोल्ड फोटोशूटमुळे नेटकरी अनेकदा तिला ट्रोल करतात. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्नेहलताची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. स्नेहलता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री; योगेश जाधवची एक्झिट

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here