Award For Outstanding Personality In Indian Film Industry Has Been Announced For Chiranjeevi At IFFI 2022

0
36


IFFI 2022 : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (International Film Festival 2022) सुरुवात झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा पुरस्काराने (Personality Of The Year) सन्मानित करण्यात आले. चिरंजीवी यांचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलाच दबदबा आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. 

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत चिरंजीवी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट केलं आहे,”अभिनेता, डान्सर आणि निर्माता म्हणून चिरंजीवी यांनी 150 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. गेली चार दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. चिरंजीवी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे…खूप खूप अभिनंदन”.
 चिरंजीवी यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 150 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. 1978 साली त्यांनी ‘पुनाधिरल्लू’ या सिनेमाद्वारे मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. चिरंजीवी यांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आजवर त्यांना 10 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

चिरंजीवी यांचे आगामी सिनेमे

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचे Walter Veerayya आणि Bholaa Shankar हे दोन सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ते ‘गॉड फादर’ (God Father) या सिनेमात बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत दिसले होते. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. 

21 नोव्हेंबरला खास काय?

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘छेल्लो शो’ हे सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसेच प्रसून जोशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, आर बल्की आणि गौरी शिंदे यांच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या ‘अल्मा आणि ऑस्कर’ या सिनेमाने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. तर क्रिसझटॉप झानुसी यांच्या ‘परफेक्ट नंबर’ या सिनेमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. देश-विदेशातील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेप्रेमी महोत्सवाला हजेरी लावत आहेत. 

संबंधित बातम्या

IFFI 2022 : ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात; जाणून घ्या आज काय खास…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here