Bollywod Star Shah Rukh Khan To Be Honored At Red Sea International Film Festival

0
9


Shah Rukh Khan At Red Sea Film Festival : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडमध्ये 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. शाहरुखची क्रेझ भारतासह परदेशातही आहे. ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Red Sea IFF) शाहरुखला सन्मानित करण्यात येणार आहे. नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. 

‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ 1 ते 10 डिसेंबर दरम्यान सौदी अरेबियात पार पडणार आहे. जगभरातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याची सिनेप्रेमींसह सेलिब्रिटींमध्येदेखील क्रेझ आहे. तसेच 41 भाषेतील 61 देशांच्या 131 फीचर आणि शॉर्ट फिल्मचं या पुरस्कार सोहळ्यात स्क्रीनिंग होणार आहे. 

सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल शाहरुख खानला ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील शाहरुखच्या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आजवर त्याने 100 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 

शाहरुख खानला ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याने या फेस्टिव्हलचे सीईओ खूप उत्सुक आहेत. ते म्हणाले,”जागतिक सुपरस्टार आणि एक उत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आज शाहरुख खान सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये त्याला भेटण्याची आम्हाला खूप उत्सुकता आहे”. 

Reels

गेल्या काही दिवसांपूर्वी शाहरुख खानला दुबईत ‘ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्ड’ने (Global Icon Award) सन्मानित करण्यात आले होते. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी त्याला ग्लोबल आयकॉनने सन्मानित करण्यात आले. शाहरुखचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. त्याने बॉलिवूडच्या एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. 

शाहरुख खानचे आगामी सिनेमे

शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. ‘जवान’ सिनेमातदेखील शाहरुख दिसणार आहे. तसेच तापसी पन्नू आणि राजकुमार हिरानीच्या आगामी ‘डंकी’ सिनेमात शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : ‘तुझ्या जितक्या गर्लफेंड झाल्या नसतील तेवढे माझ्याकडे…’; शाहरुखनं उडवली रणबीरची खिल्लीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here