Dharavi Bank Web Series Release On Mx Player Suniel Shetty Sonali Kulkarni Web Series

0
44


Dharavi Bank: काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधलं जातं, तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समितच्या ’36 गुण’ या चित्रपटाचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारा समित रोमँटिक सिनेमानंतर अंडरबेलीवर प्रकाश टाकणारी ‘धारावी बँक’ हिंदी वेब सिरीज घेऊन आला आहे. 

कोणत्याही विषयाचे अत्यंत बारकाईनं संशोधन करून मगच आपल्याला उमगलेलं चित्र पडद्यावर सादर करायचं हे समितच्या यशाचं गमक असल्याचं त्याच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे लक्षात येतं. ‘हुप्पा हुय्या’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर ‘आयना का बायना’मध्ये समितनं एका वेगळ्याच विषयावर भाष्य केलं होतं. ‘हाफ तिकिट’ या चित्रपटानं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारली होती. आश्चर्यचकित हा सिनेमाही वेगळ्या विषयावरील होता. ’36 गुण’च्या प्रदर्शनानंतर सर्वांनाच समितच्या ‘धारावी बँक’ या वेब सिरीजची प्रतीक्षा होती. 

समितनं मुंबईतील अंडरबेलीचा खूप बारकाईनं अभ्यास केला आहे. धारावी म्हणजे केवळ एक भली मोठी झोपडपट्टी नसून, तिथं राहणाऱ्या प्रत्येक घटकानं तिला आशियातील पहिल्या क्रमांकाची झोपडपट्टी बनवलं आहे. घरदार नसल्यानं रस्त्यावर झोपणारेही इथे आहेत आणि झोपड्यांचे तीन-चार मजली टॅावर उभारणारे माफियाही आहेत. सुसंस्कृत लोकांच्या विश्वापेक्षा धारावीतील जग खूप वेगळं आहे. या सर्व गोष्टींचा समितनं खूप रिसर्च केला आहे, ज्याचा खूप फायदा त्याला ‘धारावी बँक’ बनवताना झाला. समित च्या मते मुंबईतील सुंदर ठिकाण म्हणजे धारावी. समित याच बालपण याच परिसरात गेल्याने हे सगळं त्यांनी जवळून अनुभवलं आहे. एमएक्स प्लेअरची ही ओरिजनल सिरीज आहे. ‘धारावी बँक’मध्ये एक वेगळं जग पहायला मिळणार आहे.
 
आतापर्यंत असंख्य सिनेमांमध्ये अंडरवर्ल्ड आणि प्रशासनाचा सामना सर्वांनीच पाहिला आहे, पण या दरम्यानच्या अनेक गोष्टी कधीच समोर आल्या नव्हत्या. त्या सर्व बारीकसारीक गोष्टी ‘धारावी बँक’मध्ये पहायला मिळणार आहेत. धारावीतील व्यवहार कसे चालतात, कशाप्रकारे इथली व्यवस्था सुरू असते, पोलिसांचे खबरी कसे काम करतात, अंडरवर्ल्डचे धागेदोरे कसे जोडलेले आहेत आणि एकूणच मुंबईतील अंडरबेलीचा उल्लेख या वेब सिरीजमध्ये आहे. या वेबसीरिजची निर्मिती झी स्टुडियोची आहे. एमएक्स प्लेअरचे चीफ कंटेट ऑफिसर गौतम तलवार तर सीनियर क्रिएटीव्ह प्रोड्यूसर पेरसी जामशेदजी आहेत.

‘धारावी बँक’मध्ये ‘थलाईवन’च्या भूमिकेत अभिनेता सुनील शेट्टी आहे, तर त्याच्या मागावर असलेला जेसीपी जयंत गावस्कर हा पोलीस अधिकारी बनलाय अभिनेता विवेक ओबेरॅाय.  सोनाली कुलकर्णी, नागेश भोसले, फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, जयवंत वाडकर शांती प्रिया, ल्यूके किनी, वामशी कृष्णन, भावना राव, समीक्षा भटनागर, श्रुती श्रीवास्तव, हितेश भोजराज, पवित्रा सरकार, रोहित पाठक आदी कलाकार ‘धारावी बँक’ या वेब सिरीजमध्ये आहेत. या वेब सीरीजचे लेखन सार्थक दास गुप्ता यांचे आहे. छायांकन विजय मिश्रा तर संकलन आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. अॅक्शन विक्रम दहिया तर वेशभूषेची जबाबदारी किन भाटिजा यांनी सांभाळली आहे. प्रोडक्शन डिझाईन वाडिया खान, राकेश यादव, तर बीजीएम अमर मोहिले यांनी केले आहे. कास्टिंग कुणाल शहा तर व्हीएफएक्स पंकज अजवानी यांचे आहे. साउंड डिझायनिंग आणि मिक्सिंग अजय कुमार पीबी यांचे आहे. 19 नोव्हेंबरला एमएक्स प्लेअरवर ‘धारावी बँक’ स्ट्रीम झाली आहे.

Reels

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 21 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here