IFFI 2022 Ajay Devgn Chiranjeevi Special Honours In 53rd Indian International Film Festival Goa

0
29


International Film Festival Of India: 53 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीला (IFFI) सुरूवात झाला आहे. काल (20 नोव्हेंबर) केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी गोव्यामध्ये इफ्फीचे उद्घाटन केले. पॅनल चर्चा आणि भारतातील विविध सिनेमांचे प्रदर्शन या चित्रपट महोत्सवात केलं जाणार आहे.  यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सन्मानित करण्यात आलं. 

या सेलिब्रिटींना करण्यात आलं सन्मानित
53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात अभिनेता चिरंजीवी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा पुरस्काराने (Personality Of The Year) सन्मानित करण्यात आले.  तर यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार पटकवणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणला देखील विशेष सन्मानाने गौरविण्यात आले आहे. अजय देवगणबरोबरच परेश रावल, सुनील शेट्टी, मनोज बायपेयी आणि बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांना आयएफएफआय 2022 मध्ये गौरवण्यात आले. 

भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठा चित्रपट महोत्सव रविवार 20 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. गोव्यातील डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथील इनडोअर स्टेडियममध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार असून, त्यात देश-विदेशातील अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत.

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘छेल्लो शो’ हे सिनेमे दाखवले जाणार आहेत. तसेच प्रसून जोशी, नवाजुद्दीन सिद्दीकी, आर बल्की आणि गौरी शिंदे यांच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

IFFI 2022 : भारतीय चित्रपटसृष्टीतील Personality Of The Year चिरंजीवी यांना जाहीर!

 





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here