Power Rangers Star Jason David Frank Dies At 49

0
36


Jason David Frank: अभिनेता आणि मिक्स मार्शल आर्टिस्ट असणारा पावर रेंजर्स (Power Rangers) स्टार जेसन डेविड फ्रँकचं (Jason David Frank) निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी टेक्साासमध्ये त्यानं अखेरचा श्वास घेतला. फ्रँक्स ऑन द पॉवर रेंजर्सचा कलाकार वॉल्टर ई. जोन्सनं (Walter E Jones) इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन जेसन डेविड फ्रँकला श्रद्धांजली वाहिली. 

वॉल्टर ई. जोन्सनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये वॉल्टर ई. जोन्सनं लिहिलं, ‘तू आम्हाला सोडून गेला आहेस, यावर माझा विश्वास बसत नाही. आमच्या स्पेशल फॅमिलीमधील एक सदस्य कमी झाला.’ वॉल्टर ई. जोन्सच्या या पोस्टला कमेंट करुन जेसन डेविड फ्रँकच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. 

फ्रँकने 28 ऑगस्ट 1993 ते 27 नोव्हेंबर 1995 या कालावधीत शोच्या पहिल्या सीझनमध्ये टॉमी ऑलिव्हरची भूमिका केली होती. ग्रीन रेंजर म्हणून त्याची भूमिका चौदा भागांनंतर संपली. परंतु त्याच्या लोकप्रियतेमुळे, त्याला व्हाइट रेंजर आणि उर्वरित मालिकेसाठी संघाचा नवीन कमांडर म्हणून परत बोलावण्यात आले होते.


जेसन डेविड फ्रँक यांचे एजंट, जस्टिन हंट यांनी एका निवेदनात म्हटले की, या कठीण वेळी त्याच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्राव्हसीचा आदर करणे महत्वाचे आहे कारण आमची प्रिय व्यक्ती आम्हाला सोडून गेली आहे.  कराटेमध्ये आठव्या डिग्रीचा ब्लॅक बेल्ट असलेला फ्रँक 1996 मध्ये पॉवर रेंजर्स झीओ या नवीन नावाने रेड झिरो रेंजर म्हणून 50 भागांमध्ये काम केलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 21 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here