World Television Day 2022 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

  0
  34


  World Television Day 2022 : समाजात दिवसागणिक टेलिव्हिजन पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आज आपण टिव्हीवर जे कार्यक्रम पाहतो ते एकेकाळी ब्लॅक अॅन्ड व्हाइट असायचे. त्यानंतर तंत्रज्ञान युगात झालेल्या बदलांमुळे टिव्हीमध्येही अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. आधी एखाद्या डब्ब्याप्रमाणे दिसणारा हा टिव्ही आता अगदी स्लिम-ट्रिम झाला आहे. कदाचित येणाऱ्या काळात टिव्ही हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम होणार याची जाणीव लोकांना 1996 मध्येच झाली होती. कारण त्याच वर्षी 21 नोव्हेंबर पासून ‘वर्ल्ड टेलिव्हिजन डे’ साजरा केला जात आहे.

  जागतिक दूरदर्शन दिनाचा इतिहास (World Television Day History 2022) :

  पहिला जागतिक दूरचित्रवाणी मंच 21 नोव्हेंबर 1996 रोजी झाला आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून घोषित केला. संप्रेषण आणि जागतिकीकरणामध्ये टेलिव्हिजनच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

  1996 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम बोलावण्यात आली होती. यामध्ये जगभरातील टिव्ही इंडस्ट्रीतील प्रमुख लोक सहभागी झाले होते. सर्वांनी वैश्विक राजनिती आणि डिसिजन मेकिंगमध्ये टेलिव्हिजनच्या सहभागाविषयी चर्चा केली. यावेळी सर्वांनी असा निष्कर्ष काढला की, समाजात दिवसागणिक टिव्हीचं महत्त्व वाढत आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंबलीने 21 नोव्हेंबर रोजी ‘वर्ल्ड टेलिविजन डे’ घोषित करण्यात आला. हा निर्णय वैश्विक सहकार्य वाढविण्यासाठी टेलिव्हिजनचं योगदान वाढविण्यासाठी घेण्यात आला होता.

  Reels

  जागतिक दूरदर्शन दिनाचे महत्त्व (World Television Day Importance 2022) :

  युनायटेड नेशन्सने ही कल्पना लोकप्रिय केली की, टेलिव्हिजन हे समकालीन जगात जागतिकीकरण आणि संवादाचे प्रतीक आहे. लोकांच्या मनोरंजनाबरोबरच कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी टेलिव्हिजनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरदर्शन हे माहिती आणि शिक्षणाचे प्रमुख स्त्रोत आहे. तसेच, ते लोकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरदेखील प्रभाव टाकते. कारण टेलिव्हिजन जगात घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष वेधून घेते. जागतिक टेलिव्हिजन दिन देखील समाजावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि घटनांबद्दल नि:पक्षपाती माहिती प्रदान करण्यासाठी, दूरचित्रवाणी माध्यमांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकार, संस्था आणि व्यक्तींच्या भूमिकेचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो. 

  महत्वाच्या बातम्या : 

  Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस  Source link

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here