Advance Booking Of Avatar The Way Of Water Is Start

0
23


AVATAR: THE WAY OF WATER:  दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron)यांच्या  ‘अवतार’  चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way Of Water)या अवतारच्या सीक्वेलच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आता भारतातील प्रेक्षक या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करु शकतात. 

नवा ट्रेलर रिलीज

अवतार रिलीज झाल्यानंतर आता 13 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ असं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अनेक जण सध्या या ट्रेलरची तुलना गेम ऑफ थ्रोन्स या वेब सीरिजसोबत कर आहेत. 

Reels

अवतारच्या या सिक्वेलमध्ये पहिल्या पार्टमध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टीचा पुढील भाग दाखवण्यात येणार आहे. यामध्ये  ‘सुली परिवार’यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात येणार आहेत.या अडचणींचा सामना ते कसे करतात हे देखील  ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ मध्ये दाखवण्यात येईल.  हा चित्रपट भारतात  हिंदी  , इंग्रजी तसेच तमिळ, तेलगू आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

अवतार चित्रपटाचे किती भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीस? 

अवतार-2 म्हणजेच ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ नंतर अवतार-3 हा चित्रपट  रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अवतार-3 चं नाव ‘द सिड बेअरेर’ असं असणार आहे. हा चित्रपट  20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.  तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव ‘द कुलकून रायडर’ असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे.हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Avatar 2 Trailer Out: निळ्या विश्वाची जादू, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शितSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here