Manasi Naik Reveals She Has Filed For Divorce From Pradeep Kharera

0
33


Manasi Naik: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीचा घटस्फोट होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मानसीनं या चर्चेवर मौन सोडलं आहे. 

काय म्हणाली मानसी? 

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाच्या सुरु असलेल्या चर्चेबाबत मानसीनं सांगितलं, ‘हे खरं आहे. मी याबाबत खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, त्याची प्रक्रिया सध्या होत आहे. मी सध्या खूप भावूक झाले आहे.’

पुढे तिनं सांगितलं, ‘काय चूक झाली, याबाबत मी काही सांगू शकत नाही.  हे सर्व खूप लवकर घडले. माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे, मला पुन्हा प्रेम करायचे आहे. एक काळ असा होता की मला कुटुंब हवे होते आणि मग मी लग्न केले. अर्थात, ते खूप लवकर घडले त्यामुळे मला वाटते की हे सर्व तिथेच चुकले. माझ्यासाठी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मला त्यांच्या (प्रदीप खरेरा) कुटुंबाबद्दल आणि त्यांच्याबद्दल खरोखर आदर आहे. पण एक स्त्री म्हणून मला स्वाभिमान आहे.’ पुढे मानसीनं सांगितलं की, सध्या ती करिअरकडे लक्ष केंद्रित करणार आहे. 

Reels

प्रदीपची पोस्ट: 

नुकतीच प्रदीपनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ‘ रो रहाँ हू एक मुद्दत से, इश्क जो हो गया था शिद्दत से,तजुर्बा है तभी तो कहं रहा हूँ, मौत अच्छी है इस मोहोब्बत से!’ त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

मानसीनं प्रदीपला सोशल मीडियावर अनफॉलो केलं तसेच तिनं प्रदीपसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. त्यामुळे ते दोघे विभक्त होणार आहेत,अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. 

 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले. प्रदीप आणि मानसीच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या दोघांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मानसीचा एकदम कडक हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. तिच्या  ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’  या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मानसी तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Manasi Naik : मानसी नाईकचा घटस्फोट? चर्चांवर मानसी नाईक अप्रत्यक्षरित्या म्हणाली,”डोळ्यासमोर काळी पट्टी बांधली…”



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here