Nora Fatehi Big Reveal A Co Star Earring Because She Has Disclosed Many Things In The Program Kapil Sharma

0
30


Nora Fatehi Fight With Co-Star : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. नोरा नुकतीच ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात दिसून आली. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान तिने सहकलाकारासोबतच्या वादाचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकूण सर्वांनाचा धक्का बसला. 

‘अॅन अॅक्शन हीरो’ (An Action Hero) हा नोरा फतेहीचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नोरा, आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि जयदीप अहलावतने ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान कपिल शर्माला नोराला खूप फ्लर्ट करताना दिसून आला. 


Reels

कपिल शर्माने नोराच्या सौंदर्यांचे प्रचंड कौतुक केले. त्यावेळी नोरा म्हणाली, मी आजवर पाणी-पुरी खाललेली नाही. नोराच्या या भाष्यावर चांगलाच हशा पिकला. दरम्यान ‘दिलबर गर्ल’ने खुलासा केला की, तिचा सहकलाकारासोबतचा वाद मारामारीपर्यंत पोहोचला होता”. 

नेमकं प्रकरण काय?

कपिल शर्माने नोराला विचारलं, तुझं कधी कोणत्या सहकलाकारासोबत भांडण झालं आहे का? यावर उत्तर देत नोरा म्हणाली,”बांग्लादेशात एका सिनेमाचं शूटिंग करत होते.  शूटिंगदरम्यान सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केलं. त्यावेळी कसलाच विचार न करता मी त्याच्या कानशिलात लगावली त्यानंतर त्यानेही माझ्या कानशिलात लगावली. मी पुन्हा त्याला थप्पड मारली तर त्याने माझे केस ओढले”. 

नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे. ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दिलबर’ या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Kartik Aaryan: शिक्षण इंजिनीअरिंगचं, पण अभिनयाची आवड; पदार्णपणातच बॉलिवूड गाजवणारा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here