Shehzada Teaser Out Kartik Aaryan New Film Teaser On His Birthday

0
28


Shehzada Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कार्तिकच्या भूल भूलैया-2 या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच तिचा त्याचा ‘शहजादा’ (Shehzada)  हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका  साकारली आहे. नुकताच  ‘शहजादा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

आज कार्तिकचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाला ‘शहजादा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. रोहित धवननं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

पाहा टीझर 

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

काही नेटकऱ्यांनी ‘शहजादा’ चित्रपटाच्या टीझरला ट्रोल केलं आहे. या टीझरबाबत ट्वीट करुन अनेक नेटकऱ्यांनी या चित्रपटाची तुलना ‘अला वैंकुठपुरमलो’ या अल्लू अर्जुनच्या चित्रपटासोबत केली आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा ‘अला वैंकुठपुरमलो’  हा चित्रपट रिलीज झाला होता. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘कॉपी पेस्ट, अला वैंकुठपुरमलो’ तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘अल्लू अर्जुनसारखं कोणीच काम करु शकत नाही.’

‘साऊथचा चित्रपट जरी कॉपी केला तरी साऊथचा क्रिन्च स्टाईल कॉपी करु नका.’ असंही ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं.  

पाहा नेटकऱ्यांचे ट्वीट: आता अल्लू अर्जुनच्या ‘अला वैंकुठपुरमलो’ चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का ? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 22 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here