Drishyam 2 The Movie Drishyam 2 Is Blowing Up At The Box Office Soon This Movie Will Reach 100 Crore Mark Know Five Days Earnings

0
25


Drishyam 2 Box Office Collection Day 5 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. 18 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पाच दिवसांतच या सिनेमाने बजेटपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

‘दृश्यम 2’ची कमाई : 

  • पहिला दिवस – 15.38 कोटी
  • दुसरा दिवस – 21.59 कोटी
  • तिसरा दिवस – 27.17 कोटी
  • चौथा दिवस – 11.87 कोटी
  • पाचवा दिवस – 11 कोटी
  • एकूण कमाई – 87.01 कोटी

100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होण्यासाठी ‘दृश्यम 2’ सज्ज 

‘दृश्यम’ हा सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने चांगलाच धमाका केला. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहू लागले. ‘दृश्यम 2’ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. पाच दिवसांपूर्वी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. आता हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज आहे. 

‘दृश्यम 2’ या सिनेमाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. थरार-नाट्य असणाऱ्या या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून ब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून आता ते या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. तर दुसरीकडे रिलीजच्या सहा आठवड्यानंतर ‘दृश्यम 2’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहे. 

‘दृश्यम 2’चं कथानक काय?

‘दृश्यम 2’ या सिनेमात अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे. विजय साळगावकर हा एका थिएटरचा मालक आहे. तो सिनेमांसाठी प्रचंड वेडा आहे. त्याला एक सिनेमा करायचा असल्याने तो एका लेखकाची भेट घेतो. त्याने लिहिलेल्या कथेवर तो समाधानी नसतो. त्यामुळे विजय पुन्हा नव्या कथानकावर काम करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे त्याचे कुटुंबीय सात वर्षांपूर्वी घडलेली घटना विसरलेले नाहीत. त्यामुळे आता पुढे काय होईल हे प्रेक्षक सिनेमात पाहू शकतात. 

Reels

संबंधित बातम्या

Drishyam 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘दृश्यम 2’ ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कोणी विकत घेतले डिजिटल राइट्स…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here