Neha Bhasin Dont Want Your Own Child Bigg Boss Fame Neha Bhasin Statement Caught The Attention Of Netizens

0
24


Neha Bhasin : लोकप्रिय गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) सध्या चर्चेत आहे. माझी स्वत:ची मुलं असतील असा मी कधी विचार केलेला नाही. मला स्वत:चं मूल नकोच आहे, असं नेहा एका मुलाखतीत म्हणाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. 

हिंदुस्तान टाइम्सने नेहा भसीनला खासगी आयुष्यासंबंधित अनेक प्रश्न विचारले. लग्नाला सहा वर्ष झाल्यानंतर आता पुढे काय? असं विचारलं असता नेहा म्हणाली,”इंग्रजी अल्बम ते वर्ल्ड टूर माझं प्रत्येक स्वप्न साकार करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं आयुष्यात मी कधी आई होणार नाही. पण मला अनाथआश्रम सुरू करायला आवडेल. त्यामुळे मला 10-12 मुलांची काळजी घेता येईल. त्यांना शिकवता येईल”. 

नेहा पुढे म्हणाली,” माझी स्वत:ची मुलं असतील असा मी कधी विचार केलेला नाही. मला स्वत:चं मूल नकोच आहे. पण अनाथ मुलांसाठी काम करायला मला आवडेल. त्यांच्यासाठी माझ्या मनात कायमच प्रेम आहे. बालपणापासूनच अनाथ मुलांना दत्तक घेण्याची माझी इच्छा होती. पण आता मला असं वाटतं की एक मुल दत्तक घेण्यापेक्षा जास्त काहीतरी मी करू शकते. त्यामुळे पुढल्या दोन-तीन वर्षांत मी यावर काम करणार आहे. 


नेहा भसीन ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘बिग बॉस 15’मुळे चर्चेत आली होती. नुकताच तिचा 40 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त तिने खास पार्टीचे आयोजन केले होते. नेहा आज एक उत्तम गायिका असली तरी आयुष्यात तिला अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत.

नेहाने हिंदीसह पंजाबी, तामिळ आणि तेलुगू भाषेतील गाणीदेखील गायली आहेत. 2004 साली नेहाने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. पण ‘फॅशन’ या सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. नेहाची ‘जग घूमेया’, ‘कुछ खास’, ‘दिल दिया गल्ला’ अशी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. 

संबंधित बातम्या

Happy Birthday Neha Bhasin : आवाजाने तरुणांना घायाळ करणारी नेहा भसीन; हिंदी, पंजाबीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत डंका

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here