Actor Richa Chadha Apologises Amid Backlash Over Galwan Tweet

0
32


Richa Chadha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)  ही तिच्या ट्वीटमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या रिचा तिच्या एका ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं. या ट्वीटला रिप्लाय करत रिचानं लिहिलं,‘गलवानने HI म्हटलंय’. रिचानं केलेल्या या  रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं केला आहे, असा आरोप काही नेटकरी तिच्यावर करत आहेत. आता रिचानं या प्रकरणावर मौन सोडलं आहे. रिचानं एक ट्वीट शेअर करुन माफी मागितली आहे. 

रिचाचं ट्वीट 
रिचानं ट्वीटमध्ये लिहिलं, मला कोणाला दुखवायचे नव्हते. मी ट्वीटमध्ये लिहिलेल्या तीन शब्दांनी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांनी माफी मागते. माझे आजोबा स्वतः सैन्यात होते आणि लेफ्टनंट कर्नल पदावर होते. भारत-चीन युद्धात त्याच्या पायाला गोळी लागली होती. माझे मामा सुद्धा पॅराट्रूपर होते. हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे.’

News Reels

‘रिचा चड्ढानं सुरक्षा दलांची, विशेषत: गलवान खोऱ्यात ज्यांनी आपले प्राण दिले त्यांची थट्टा केली आहे. हे गुन्हेगारी कृत्य आहे. तिच्यावर एफआयआर दाखल करणे आवश्यक आहे.’ असं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये फिल्ममेकर अशोक पंडित यांनी सांगितलं. 

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल: 

लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं.  या ट्वीटला रिचाने ‘गलवानने HI म्हटलंय’ असा रिप्लाय केला. रिचाच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. भाजप नेते  मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्वीट शेअर करुन रिचाच्या ट्वीटचा समाचार घेतला आहे. ‘निंदनीय ट्वीट. हे ट्वीट लवकरात लवकर मागे घेण्यात यावे. आपल्या सशस्त्र दलांचा अपमान करणाऱ्याचं समर्थ करु नये.’

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Richa Chadha: रिचा चड्ढाच्या ट्वीटची चर्चा; गलवानचा उल्लेख करत भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा नेटकऱ्यांकडून आरोप





Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here