Drishyam 2 Box Office Collection Day 6 Ajay Devgn Tabu Shriya Sharan Movie

0
39


Drishyam 2 Collection Day 6दृश्यम (Drishyam) या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला (Drishyam 2) देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.   बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत, तरी या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

दृश्यम 2 चं कलेक्शन  
‘दृश्यम 2’चे ओपनिंग डे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. तर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली. या चित्रपटानं 21.59 कोटींची कमाई दुसऱ्या दिवशी केली. तसेच दृश्यम-2 नं तिसऱ्या दिवशी 27.17 कोटींची कमाई केली तर चौथ्या दिवशीही चित्रपट चांगले कलेक्शन करण्यात यशस्वी ठरलाय चौथ्या दिवशी या चित्रपटानं 11.87 कोटी रुपयांची कमाई केली. ‘दृश्यम 2’ ने 5 व्या दिवशी 10.48 कोटी रुपयांची कमाई केली. बुधवारी (23 नोव्हेंबर) या चित्रपटानं 10 कोटी कमावले. आता या चित्रपटाची एकूण कमाई  96.49 कोटी एवढी झाली आहे. 

दृश्यम-2 या चित्रपटाची निर्मिती 50 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. दृश्यम 2 हा भारतात 3302 स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये 858 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.  म्हणजेच हा सिनेमा एकूण 4 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला. ‘दृश्यम 2’ या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.

News Reels

अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते. 

ओटीटीवर होणार रिलीज
‘दृश्यम 2’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात गाजत आहे. आता या सिनेमाचे डिजिटल राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. त्यामुळे आता प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांना बघता येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Drishyam 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘दृश्यम 2’ ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कोणी विकत घेतले डिजिटल राइट्स…

 Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here