Vikram Gokhale Health Update Given By Family Friend Rajesh Damle

0
11


Vikram Gokhale:  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर  (Deenanath Mangeshkar Hospital) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजेश दामले यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. 

‘कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खूप  कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण डॉक्टरांचे सध्या प्रयत्न सुरु आहेत.  जसे पुढचे अपडेट्स येतील तसे सर्वांना कळवले जाईल.  त्यांची मेडिकल कंडिशन ही क्रिटीकल आहे.’ असं विक्रम गोखले यांचे स्नेही राजेश दामले यांनी सांगितलं. 

अफवांवर विश्वास ठेवू नका: राजेश दामले

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांबाबात देखील राजेश दामलेंनी सांगितलं. ते म्हणाले, ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत डॉक्टर माहिती देत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा.’

News Reels

विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबात माहिती दिली. त्यांनी सांगितलं, ‘विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी एबीपी न्यूजला विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,’ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.’

विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते. 

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. तसेच विक्रम गोखले यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू, दीनानाथ रुग्णालयाकडून माहिती

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here