Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून मिळत आहे. काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी एबीपी न्यूजला विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,’ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.’
विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वृषाली यांनी सांगितलं की, ‘विक्रम गोखले यांच्यावर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.’
“Veteran Actor Vikram Gokhale is still critical and on life support, he has not passed away yet. Keep praying for him,” confirms Vikram Gokhale’s daughter
(File pic) pic.twitter.com/bs53dFIbxE
News Reels
— ANI (@ANI) November 23, 2022
30 ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केला. विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
अग्निपध, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. विक्रम गोखले यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: