Akshay Kumar Share Post On Riteish Deshmukh And Genelia Deshmukh Movie Ved

0
9


Ved Teaser: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा वेड (Ved) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काल रिलीज झाला. या टीझरला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटाला आता अभिनेता अक्षय कुमारनं (Riteish Deshmukh) मराठीमध्ये खास पोस्ट शेअर करुन शुभेच्छा दिल्या.  

अक्षयची पोस्ट

अक्षयनं सोशल मीडियावर वेड चित्रपटाचा टीझर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझा भाऊ आणि ॲक्टर आता डिरेक्टर झालाय. त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टीझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं. तुम्हीही पहा तुम्हालाही लागेल…वेड!  रितेश आणि जिनिलिया तुम्हाला शुभेच्छा.’

रितेशची कमेंट 
रितेशनं अक्षयच्या पोस्टला कमेंट केली, ‘धन्यवाद माझ्या प्रिय मित्रा माझा चित्रपटाचा टीझर लाँच केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. ‘

News Reels


रितेश आणि जिनिलिया यांच्या बरोबरच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहे. आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. सलमान खान वेड या चित्रपटात काम करणार आहे. काही महिन्यांपूर्वी वेड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो रितेशनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तो सलमानसोबत सेटवर मजा करताना दिसत आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ved Teaser: ‘नव्या प्रवासाची सुरवात करतो’; रितेशनं शेअर केला ‘वेड’चा टीझर

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here